-10.8 C
New York
Sunday, January 25, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राचा सन्मान: आभा शुक्ला यांना ‘वूमन इन एनर्जी’, महावितरणला ‘एनर्जी कंपनी’ पुरस्कार

राज्याच्या अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांना नवी दिल्ली येथे केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री ना. श्रीपाद नाईक आणि माजी केंद्रीय ऊर्जा सचिव श्री. अनिल राजदान यांच्या हस्ते ‘एनर्जी लिडरशिप अवॉर्ड २०२५’ प्रदान.

नवी दिल्ली | २६ सप्टेंबर २०२५

राज्याच्या ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांना ‘वूमन इन एनर्जी अवॉर्ड २०२५’, तर महावितरण कंपनीला ‘एनर्जी कंपनी (पॉवर) अवॉर्ड’ हा मानाचा सन्मान मिळाला आहे. दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय एनर्जी लिडरशिप शिखर परिषद २०२५ मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि माजी ऊर्जा सचिव अनिल राजदान यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. या परिषदेत ऊर्जा, पर्यावरण, अक्षय ऊर्जा, हवामान बदल इत्यादी क्षेत्रांतील सुमारे ५०० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी सहभागी झाले होते. यामध्ये आभा शुक्ला यांनी महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रातील यशस्वी योजना व नवकल्पनांवर व्याख्यान दिले.

या पुरस्काराबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आभा शुक्ला यांचे व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र तसेच संपूर्ण महावितरण टीमचे अभिनंदन केले आहे.

राज्यातील ऊर्जाक्षेत्रात सुरू असलेल्या आमूलाग्र सुधारणांमुळे वीजदरात प्रथमच घट झाली आहे. मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० अंतर्गत विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे १० हजार कोटींची वार्षिक बचत आणि ग्रामीण भागात ७० हजार रोजगारनिर्मिती झाली आहे. राज्यातील हरित ऊर्जेवर भर देत, २०३० पर्यंत ४५ हजार मेगावॅट ऊर्जा निर्माण आणि ५२% पर्यंत नवीकरणीय ऊर्जेची क्षमता वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

अशा बहुआयामी आणि लोकाभिमुख योजना प्रभावीपणे राबविल्यामुळेच आभा शुक्ला आणि महावितरणची ‘एनर्जी लिडरशिप अवॉर्ड २०२५’साठी निवड झाल्याचे ११ सदस्यीय राष्ट्रीय निवड समितीने स्पष्ट केले आहे.

 

 

 

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles