जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत आदर्श गुरुकुल विद्यालयाचा भरघोस यश!
दि. 26 व 27 सप्टेंबर 2025 रोजी कोल्हापूर येथे पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, तसेच ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल, पेठ-वडगाव येथील विद्यार्थ्यांनी शानदार कामगिरी करत गौरव प्राप्त केला.

कु. सोहम संदेश पाटील (इयत्ता 10वी, इंग्रजी माध्यम) — प्रथम क्रमांक
कु. तेजस हंबीरराव पाटील (इयत्ता 12वी, निवासी) — द्वितीय क्रमांक
कु. वीर प्रवीण पाटील (ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल) — तृतीय क्रमांक
या तिघा विद्यार्थ्यांची पुढील विभागीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गुरुकुल परिवारातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
या यशस्वी कामगिरीमागे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रा. डॉ. डी.एस. घुगरे सर, सचिव व मुख्याध्यापिका सौ. एम.डी. घुगरे मॅडम, पर्यवेक्षक श्री. एस.जी. जाधव सर, कॉलेज विभाग प्रमुख श्री. एस.एस. चित्ते सर, ग्रीन व्हॅलीचे मुख्याध्यापक श्री. व्ही.एस. डोईजड सर, डे-विभाग प्रमुख श्री. एस.ए. पाटील सर, जिमखाना प्रमुख श्री. एन.ए. कुपेकर सर, श्री. एस.एस. मदने सर, अधीक्षक श्री. झरेकर सर, व प्रशिक्षक श्री. विश्वजीत कांबळे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.





