-10.8 C
New York
Sunday, January 25, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

“शालेय वह्यांवरील GST शून्यावर, तरीही किंमती वाढण्याची शक्यता!”

“शालेय वह्यांवरील GST शून्यावर, तरीही किंमती वाढण्याची शक्यता!”

सत्याचा शिलेदार महाराष्ट्र राज्य विशेष प्रतिनिधी डॉ. उमेश सुतार

भारत सरकारने अलीकडेच वस्तू आणि सेवा कर (GST) धोरणात मोठा बदल करत शालेय वह्यांवरील 12% GST पूर्णपणे रद्द केला आहे. यामुळे या वस्तूंना करमुक्त (0% GST) श्रेणीत टाकण्यात आले असून, विद्यार्थ्यांना व पालकांना आर्थिक दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती.

मात्र, प्रत्यक्षात या धोरणामुळे वह्यांच्या किंमती घटण्याऐवजी स्थिर राहण्याची किंवा किंचित वाढण्याची शक्यता अधिक आहे. कारण, वह्या तयार करण्यासाठी लागणाऱ्या कागद, शाई, बांधणी साहित्य यासारख्या कच्च्या मालावर अजूनही 18% GST लागू आहे.

 

या इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ अंतिम उत्पादनावर GST नसल्याने उत्पादकांना मिळत नाही. त्यामुळे कंपन्यांना हा वाढीव खर्च वसूल करण्यासाठी किंमती वाढवाव्या लागू शकतात.

 

तथापि, इतर शैक्षणिक वस्तूंवर सरकारने केलेली GST कपात विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक ठरू शकते. पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, नकाशे आणि ग्लोब यांसारख्या वस्तू करमुक्त करण्यात आल्या आहेत. तसेच, शालेय पिशव्या आणि जॉमेट्री बॉक्सवरील GST दर कमी करण्यात आला आहे.

सरकारचा उद्देश शिक्षणाशी निगडीत वस्तू अधिक परवडणाऱ्या करणे असला, तरी वस्तुस्थिती अशी आहे की उत्पादन खर्चातील वाढ ग्राहकांपर्यंतच झळ पोचवू शकते.

 

 

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles