रुकडीमध्ये लोकनेते कै.बाळासाहेब माने यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या श्रद्धाभावाने अभिवादन
रुकडी (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) – कोल्हापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, पाच वेळा खासदारपद भूषवलेले लोकनेते कै. बाळासाहेब माने यांच्या जयंतीनिमित्त रुकडी येथे अभिवादन कार्यक्रम मोठ्या श्रद्धाभावाने पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कै.बाळासाहेब माने यांच्या पुतळ्यास विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी पुष्पहार अर्पण करत त्यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी,तरुण मंडळाचे सदस्य, आणि माने गटाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकनेते कै.बाळासाहेब माने हे अफाट स्मरणशक्ती, प्रभावी वक्तृत्व आणि प्रामाणिक नेतृत्वामुळे दिल्लीपासून गावपातळीपर्यंत जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नेते होते. बहुजन समाजासाठी आधारवड ठरलेले माने साहेब आजही जनतेच्या स्मरणात आहेत.गावकऱ्यांनी अभिमानाने आणि श्रद्धेने लोकनेते कै. बाळासाहेब माने यांची जयंती साजरी केली.






