विश्ववारणा पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज तळसंदे चे शालेय कुस्ती जिल्हास्तरीय निवड खेळाडू
तळसंदे -विश्ववारणा पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज तळसंदे येथील विद्यार्थ्यां नी बळवंतराव यादव हायस्कूल, पेठ वडगाव येथे तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये कु. पृथ्वीराज समाधान निंबाळकर 68 किलो कु. अथर्व सागर पाटील 38 किलो (फ्री स्टाईल) या प्रकारात तर कु.पृथ्वीराज दादासो देशमुख 48 किलो कु.अमरसिंह जयदीप गायकवाड 92 किलो कु. साईराज दिलीप यादव 71 किलो (ग्रीको रोमन) व कु.हितेश संजय शेडगे ( फ्री स्टाईल ) या कुस्ती प्रकारामध्ये प्रथम क्रमांकाने यश यश संपादित करीत वरील सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता निवड झाली.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कॅप्टन गणपतराव घोडके सचिव डी पी पाटील व्यवस्थापक व मुख्याध्यापक दीपक महाडिक तसेच प्रशिक्षक प्रीतम कुरणे सागर सुतार स्वप्निल वसेकर यांचे मार्गदर्शन लाभले सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता शुभेच्छा देण्यात आल्या.






