11.7 C
New York
Thursday, March 26, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

जगाची सफर घडवणारे भाषा शिक्षक हेच खरे भाषादूत – मा.राजेसाहेब लोंढे 

जगाची सफर घडवणारे भाषा शिक्षक हेच खरे भाषादूत – मा.राजेसाहेब लोंढे

मिरज :- हिंदुसम्राट प्रतिनिधी संजय पवार मुलांच्या भावविश्वात जाण्यासाठी चांगल्या पुस्तकांचे वाचन शिक्षकांसाठी वरदान ठरते.भाषा विषयाचं सौंदर्य विपुल आहे. वाचनाने शिक्षकही समृद्ध होतो आणि विद्यार्थीही समृद्ध होतात. असा समृद्ध व्याख्याता -शिक्षक विद्यार्थ्यांना सुंदर मैफिलीसारखा आनंद देतो. वर्गात असूनही तो विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या भाविश्वास घेऊन जातो. एक प्रकारे जगाची सफर घडवणारे भाषाशिक्षक हे खरे भाषादूतच ठरतात. असे प्रतिपादन मा.राजेसाहेब लोंढे (शिक्षणाधिकारी- माध्यमिक) यांनी केले.माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली.मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय , जिल्हा मराठी अध्यापक संघ ,सांगली यांच्यावतीने ‘गुणवंत मराठी अध्यापक पुरस्कार’ वितरण समारंभप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी वुमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष डाॅ. लता देशपांडे तर प्रमुख उपस्थिती प्राचार्य डॉ.अनिल सुगते व साहित्यिक प्रा.सुभाष कवडे यांची होती.

 

मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवरती व नवमहाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कवी कुसुमाग्रज व यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले .प्रास्ताविक अध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. विठ्ठल मोहिते यांनी केले. आभार बजरंग संकपाळ यांनी आभार तर सूत्रसंचालन वैशाली आडमुठे व सुरेखा कांबळे यांनी केले. भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित विद्यार्थी शिक्षक-कवी संमेलनामध्ये कु. कल्याणी जोशी कु.अंजली भाट,सौ. सुरेखा कांबळे, माधव सूर्यवंशी, अश्विनी पाटील, शाहीर पाटील यांनी कविता सादर केल्या. या कविसंमेलनाचे अध्यक्ष प्रकाश वायदंडे होते.

शिक्षकांनी लिहिलेल्या पुस्तकावर चर्चा या सत्रात शिक्षक-लेखक श्री.बापूसाहेब पाटील यांच्या ‘वादळवेल’ आत्मकथनावर श्री. सुनील जाधव व दिलीप पवार यांनी एका शिक्षकाची संघर्षगाथा उलगडून दाखवली. तर साहित्यिक प्रा.सुभाष कवडे यांनी कवी प्रकाश वायदंडे यांच्या ‘आयुष्याचे पुस्तक माझे’ या कवितासंग्रहाचे वेगळेपण व त्यातील सौंदर्यस्थळे स्पष्ट केली.

अध्यापक संघाचे गुणवंत मराठी अध्यापक पुरस्काराचे मानकरी श्री. चंद्रकांत बेडगे (तासगाव),श्री. संभाजी सरक,सौ. विद्या चौगुले (सांगली), व श्री बापूसाहेब मासाळ (कवठेमंकाळ) यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानपत्र,शाल, श्रीफळ ,ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले. मानपत्राचे वाचन अनुक्रमे रमेश, पाटील महादेव चौगुले वैशाली आडमुठे ,सुरेखा कांबळे यांनी केले. तसेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद व अभ्यास मंडळावरती कार्यरत असणारे शिक्षक श्री.प्रकाश वायदंडे, वैशाली आडमुठे, दिलीप पवार, सुनील जाधव, सुरखा कांबळे यांचाही सत्कार याप्रसंगी करण्यात आला.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles