11.7 C
New York
Thursday, March 26, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

चिंतन दिन जिल्हास्तरीय मेळाव्यात वालावलकर माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश

चिंतन दिन जिल्हास्तरीय मेळाव्यात शां. कृ. पंत वालावलकर माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश

 

कोल्हापूर : भारत स्काऊट आणि गाईड, कोल्हापूर जिल्ह्यातर्फे चिंतन दिनानिमित्त कब, बुलबुल, स्काऊट-गाईड व बनी यांचा जिल्हास्तरीय मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात कोल्हापूर येथील शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलच्या स्काऊट व गाईड पथकांनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश मिळविले.

मेळाव्यात विविध स्पर्धा, प्रात्यक्षिके, शिस्तबद्ध संचलन, सादरीकरणे, हस्तकला, गाठी बांधणे, प्रथमोपचार कौशल्ये तसेच पूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, शिस्त, संघभावना व नेतृत्वगुण यांचे उत्कृष्ट प्रदर्शन करत परीक्षकांची मने जिंकली.

स्काऊट व गाईड पथकास सहाय्यक शिक्षिका इंद्रायणी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. स्काऊट तुकडीसोबत उत्तम भोये तर गाईड तुकडीसोबत तृप्ती वसावे उपस्थित होत्या.

यावेळी प्रा. डॉ. विलास पवार यांनी चिंतन दिनाचे औचित्य साधून स्काऊट चळवळीचे संस्थापक  रॉबर्ट बेडन पॉवेल यांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांच्या विचारांमधून विद्यार्थ्यांनी सेवाभाव, शिस्त व देशप्रेमाची प्रेरणा घ्यावी, असे त्यांनी प्रतिपादन केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना जिल्हा संघटक कविता चौगुले यांनी स्काऊट चळवळीमुळे विद्यालयाचा लौकिक जिल्ह्यात अधिक वृद्धिंगत होईल व विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला.

स्पर्धांमध्ये स्काऊट कौशल्य सादरीकरणात स्काऊट तुकडीने प्रथम क्रमांक पटकाविला, तर उत्कृष्ट तुकडी स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला. गाईड तुकडीने उत्कृष्ट तुकडी तसेच कौशल्य सादरीकरण स्पर्धेत द्वितीय क्रमांक संपादन केला.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापिका वृषाली कुलकर्णी, उपमुख्याध्यापक मोरे, शिक्षकवृंद, स्काऊट-गाईड पदाधिकारी तसेच पालकांनी अभिनंदन केले.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles