2.3 C
New York
Saturday, March 28, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

श्री शाहू हायस्कूल ज्यूनि कॉलेज मध्ये मराठी राजभाषा गौरव दिन संपन्न

श्री शाहू हायस्कूल ज्यूनि कॉलेज मध्ये मराठी राजभाषा गौरव दिन संपन्न

कागल- सुभाष भोसले

शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित श्री शाहू हायस्कूल मध्ये कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त मराठी भाषा गौरव दिन संपन्न झाला . या कार्यक्रमाला प्राचार्य श्री टी ए पोवार, उपमुख्याध्यापक श्री आर एस पाटील, पर्यवेक्षिका सौ यु सी पाखरे, उपप्राचार्या एस व्ही कुडतरकर, व्ही बी आलदार, सौ आर आर कुलकर्णी,सुरज हरेल एम बी घोरपडे , बी एन शिंदे, के आय जमादार, महेश शेडबाळे, पी बी माणगावे, शशिकांत सुर्दशनी, जे पी पाटील, एस एस इनामदार, सौ टी ए पाटील, सौ एस पी जाधव, सौ एस डी शेणवी, सौ डी के जमादार,सौ व्ही एस सुदर्शनी, गणेश पुरेकर , राहूल वाघमोडे , प्रशांत मगदूम, संताजी जाधव,संतोष कुंभार, संदिप पाटील, प्रविण सणगर, प्रमोद कांबळे, महेश चंद्रकुडे अनिकेत तिप्पे, सागर पाटील व सर्व ज्यूनिअर माध्यमिक विभागाचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते . सर्वांनी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पाजंली अर्पण केली . दिप देसुरे, जैनब शहा, श्रेयस पाटील या विद्यार्थ्यांनी मराठी गौरव दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले . श्री बी एन शिंदे यांनी मराठी भाषा दिनाचे महत्व विशद केले व कवी कुसुमाग्रज, ग .दि माडगूळकर, लेखक वि. स .खांडेकर यांचे मराठी भाषेतील योगदानाबद्दल माहिती दिली . प्राचार्य टी ए पोवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांना मराठी भाषेबद्दल अभिमान असला पाहिजे अनेक साहित्यिक यांचे मराठी भाषेसाठी योगदान प्रेरणादायी आहे त्याच्यां विचाराचा वारसा चालविणेची जबाबदारी सर्वांची आहे . कु .आदिती पाटील हिने आभार व्यक्त केले तर सूत्रसंचालन कु . तनिष्का माधळे हिने केले

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles