11.7 C
New York
Thursday, March 26, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

पोस्टाच्या तिकिटावर झळकले डॉ. मोहन गोखले : कुरुकली गावाचा अभिमान

पोस्टाच्या तिकिटावर झळकले डॉ. मोहन गोखले : कुरुकली गावाचा अभिमान

 

संघर्षमय कुटुंब पार्श्वभूमी, उद्योजकता व समाजकार्याच्या जोरावर राष्ट्रीय सन्मान 

पत्रकार- सुभाष भोसले

कुरुकली (ता. कागल, जि. कोल्हापूर) : साध्या कुटुंबातून सुरू झालेला संघर्षमय प्रवास आज पोस्टाच्या तिकिटावर झळकला असून कुरुकली गावासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. उद्योजक, समाजसेवक, शिक्षणप्रेमी व पत्रकार म्हणून ओळख असलेले डॉ. मोहन गोखले यांच्या छायाचित्रासह विशेष वैयक्तिक टपाल तिकिट प्रकाशित करण्यात आले आहे. हा गौरव India Post यांच्या ‘My Stamp’ उपक्रमांतर्गत करण्यात आला आहे.

डॉ. गोखले यांची कौटुंबिक पार्श्वभूमी अत्यंत साधी व कष्टमय आहे. त्यांचे वडील ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत असून आई मोलमजुरी करून कुटुंबाचा संसार सांभाळत होत्या. अशा परिस्थितीत वाढताना कष्ट, शिस्त आणि जिद्द हे संस्कार त्यांच्यावर बालपणापासूनच झाले. मर्यादित साधनसामग्री असूनही शिक्षण आणि प्रगतीचा ध्यास त्यांनी कधी सोडला नाही.

उद्योजकतेच्या क्षेत्रात त्यांनी शून्यातून उभारलेली वाटचाल अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. रोजगारनिर्मिती, युवकांना मार्गदर्शन आणि सामाजिक जबाबदारी जपणारा उद्योग उभा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. समाजकार्याच्या माध्यमातून वंचित घटकांना आधार देणे हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य राहिले आहे.

विशेष म्हणजे, वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी विश्व मानवाधिकार संरक्षण समिती यांच्याकडून त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान करून गौरविण्यात आले होते. मानवाधिकार, सामाजिक न्याय आणि जनजागृती क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.

अनाथ व एकल मुलांसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर काम उभारले आहे. शिक्षण, निवारा, शिष्यवृत्ती आणि मार्गदर्शन देत त्यांनी अनेक मुलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणला. त्यांच्या कार्यामुळे समाजातील दुर्बल घटकांना नवी दिशा मिळाली आहे.

त्यांची पत्नी औषधनिर्माण (फार्मास्युटिकल) विभागातून शिक्षित असून सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतात. कुटुंबाची साथ ही त्यांच्या यशाची मोठी ताकद ठरली आहे. त्यांचा लहान मुलगादेखील सामाजिक प्रश्नांबाबत सक्रिय व सकारात्मक विचारसरणी जोपासताना दिसतो, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.

पोस्टाच्या तिकिटावर झळकलेले नाव हे केवळ एका व्यक्तीचे यश नसून कुरुकली गावाच्या कष्ट, संस्कार आणि जिद्दीचा सन्मान आहे. डॉ. मोहन गोखले यांचा संघर्षमय प्रवास आज अनेकांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरत आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles