कवी सरकार इंगळी आयोजित २७ वे मराठी ग्रामीण साहित्य सातारा येथे आयोजन
हातकणंगले प्रतिनिधी
कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित २७ फ्रेबुवारी मराठी राज्यभाषा दिना निमित्त रविवार दिनांक १ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता २७ वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन रयत शिक्षण संस्था छत्रपती शिवाजी कॉलेज जिमखाना हॉल सातारा येथे आयोजित केलेले आहे .
सदर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
मा राजेंद्र सुंदरदास फंड
(ज्येष्ठ प्रसिद्ध साहित्यिक) ता. राहता. जि अहिल्यानगर हे भूषवणार असून संमेलन उद्घाटक मा.सौ सुमन गजानन देसाई (उपसंघटक व उपाध्यक्ष यशवंत ग्राहक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य मीरा-भायंदर मुंबई) यांचे हस्ते करण्यात येणार आहे संमेलन स्वागताध्यक्ष ना मातृ भक्त. आचार्य. सी ए. डॉ. शंकर घनश्यामदास अंदानी पुणे असून
प्रतिमा पुजन मा कवी दिपक पवार सर रुकडी ता हातकणंगले जि कोल्हापूर . यांचे हस्ते तर
प्रमुख पाहुणे मा. डॉ श्रीकांत पाटील घुणकी( प्रसिद्ध कांदबरीकार लेखक)
त्याच प्रमाणे विविध २९ पुस्तकांचे प्रकाशन मा. डॉ शिवाजी शिंदे (साहित्यिक )
(सहायक कुलसचिव तथा मराठी भाषा दक्षता अधिकारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर) याचे हस्ते व मान्यवरांचे उपस्थीत करणेत येणार आहेत . दुसऱ्या सत्रात १२.३० वाजता कथाकथनकार बाळासाहेब देशमुख अ नगर यांचे कथाकथन होणार आहे .तिसऱ्या सत्रात मातृ भक्त आचार्य सी ए डॉ शंकर घनश्यामदास अंदानी पुणे यांच्या अध्यक्षतेखाली बहारदार कविसंमेलन होणार असून त्यात मुंबई .बुलढाणा अ . नगर छ संभाजी नगर सोलापूर नांदेड कोल्हापूर ठाणे पुणे सातारा आदी जिल्हयातील कवि कवयित्री सहभागी होणार आहेत शेवटी ४.३० भव्य राज्यसरीय शिवरत्न व शिवकन्या साहित्य ‘ कला, जीवनगौरव संत सावता माळी सह विविध पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात येणार आहे .असे कवी सरकार इंगळी यांनी प्रसिद्ध पत्रकार द्वारे कळविले आहे





