11.7 C
New York
Thursday, March 26, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

रुकडी मतदारसंघात निवडणूक वातावरण तापले; महायुतीतील बड्या नेत्यांच्या सभा व भव्य रोड शो, अपक्ष उमेदवारांची वाढत्या जनसमर्थनाची चर्चा

रुकडी मतदारसंघात निवडणूक वातावरण तापले; महायुतीतील बड्या नेत्यांच्या सभा व भव्य रोड शो, अपक्ष उमेदवारांची वाढत्या जनसमर्थनाची चर्चा

 

हातकणंगले तालुक्यातील रुकडी जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघात जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, रविवारी दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य व ऐतिहासिक रोड शो व सभा पार पडली.

या रोड शोमध्ये रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अतिश नंदकुमार शिंगे, रुकडी पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार माया सुधीर लोखंडे तसेच हेरले पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार सचिन सुकुमार जाधव यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करत केंद्र व राज्य पातळीवर विकासकामांच्या माध्यमातून झालेल्या कामांचा उल्लेख केला.

या कार्यक्रमाला खासदार धैर्यशील माने, माजी खासदार डॉ. निवेदिता माने, तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे महायुतीचे उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, याच मतदारसंघात अपक्ष उमेदवारांबाबतही जोरदार चर्चा सुरू आहे. रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष उमेदवार अविनाश बनगे यांच्या संभाव्य विजयाबाबत बोलले जात असून, लाडक्या बहिणीचे अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांनी केलेली कामे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचल्यामुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र असल्याचे नागरिक सांगत आहेत.

तसेच रुकडी पंचायत समिती मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुजाता प्रकाश धनवडे यांना मिळणारा जनसमर्थन सातत्याने वाढत असून, त्यांचा प्रतिसाद आणि जनमतही बळकट होत असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. स्थानिक प्रश्नांवर थेट काम, महिलांशी संबंधित विषयांवर सक्रिय सहभाग आणि लोकसंपर्कामुळे त्या मतदारांमध्ये विश्वास निर्माण करत असल्याचे सांगितले जात आहे.

अपक्ष उमेदवारांकडून गावनिहाय विकास नियोजन, महिलां व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना, शैक्षणिक, आरोग्य व क्रीडा सुविधा मजबूत करण्याच्या आदर्श व व्यवहार्य विकास संकल्पना मांडल्या जात असून, यामुळे मतदारसंघातील निवडणूक लढत अधिकच चुरशीची होत आहे.

एकीकडे महायुतीने प्रचाराचा जोर वाढवला असताना, दुसरीकडे अपक्ष उमेदवारांना मिळणारा वाढता प्रतिसाद चर्चेचा विषय ठरत असून, रुकडी जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघातील निवडणूक अधिकच रंजक व निर्णायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles