स्री यांनी मा जिजाऊ व सावित्री माई चा वसा व वारसा अंगिकरावा.बी. वा य.जगताप.
पुणे जिल्हा प्रतिनिधी सदाशिव रणदिवे
दौंड:-दि.१८.जानेवारी२०२६.राजमाता जिजाऊ नी बाळ शिवबा मध्ये स्वराज्याची प्रेरणा चेतवली, मावळा संघटित करून स्वराज्य निर्माण केले.रयतेला मुलासारखे सांभाळणे,स्वराज्यात समानता,सर्व धर्म समभाव जागवला ते करिता असताना स्री यांना निर्भय जगण्यासाठी समाज कंठकाना कठोर शिक्षा दिल्या.असे स्वराज्य जननी राजमाता जिजाऊंचे आपणावर प्रचंड उपकार आहेत,त्याचाच आदर्श घेऊन माता सावित्रीबाई नी विधवा ना संरक्षण, बाळ संगोपण गृह, स्री शिक्षण,व सत्यशोधक समाज निर्मिती करून लोक सेवा केली.या महान राष्ट्र मातांच्या विचाराचा वासा व वारसा आजच्या स्री ने पुढे न्यावा. असे विचार बी. वा य.जगताप तालुकाध्यक्ष राष्ट्र वादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग दौंड यांनी गोपाळ वाडी येथे व्यक्त केले.आप्पासाहेब काळे अध्यक्ष श्रीनाथज्येष्ठ नागरिक संघ यांचे अध्यक्ष ते खाली १८.१.२०२६ रोजी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. दौंड नगरपरिषदेच्या नूतन नगराध्यक्ष दुर्गादेवी जगदाळे,गटनेते जीवराज बापू पवार,स्वाती राऊत,उज्वला परकाळे व भागवत यांचा सत्कार या वेळी करनेत आला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुरेश सुळ दिनविशेष महत्त्व आयु.विजय गायकवाड यांनी सांगितले तर आभार प्रा.अर्जुन जांभूळकर यांनी मानले.कार्यक्रमास स्री पुरुषांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.





