३५ वर्षांपासून रांगोळीकर उमेदवारीच्या प्रतिक्षेत. गावातून एकच उमेदवार देणार
संतोष कमते रांगोळी प्रतिनिधी ता.१४ रांगोळी गाव गेली पस्तीस वर्षांपासून हातकणंगले पंचायत समिती सदस्य पदापासून वंचित आहे. सहा हजार मतदान असुनही राजकीय अनास्थेमुळे गावास पंचायत समितीची उमेदवारी मिळाली नाही. बदलेल्या प्रभाग रचनेमुळे गावास पंचायत समितीची उमेदवारी मिळाली पाहिजे असा गावकऱ्यांनी निर्धार केला आहे.
हातकणंगले तालुक्यात रेंदाळ जिल्हा परिषद व चंदुर पंचायत समिती अशी प्रभाग रचना होती. जास्त लोकसंख्येमुळे सर्वच पक्षाचा चंदुरला उमेदवारी देण्याचा कल होता. १९६०/६५ च्या काळात ग्रामपंचायत सदस्यांच्या मतदानातून रघुनाथराव देसाई हे विजयी झाले होते.यानंतर पस्तीस वर्षांपुर्वी पंचायत समितीला जनता दलातर्फे स्वीकृत सदस्य म्हणुन रांगोळीतुन सुशिला शिरोळकर यांना संधी मिळाली होती. यावर्षी प्रभाग रचना बदलात रांगोळी पंचायत समिती मतदारसंघ होईल असे वाटत असताना परत रेंदाळ पुर्व असा मतदार संघ करण्यात आला. मतदानाची टक्केवारी पाहता रेंदाळाचे सर्वाधिक मतदान येते. यामुळे परत रांगोळी उमेदवारीपासुन वंचित राहू नये याची दखल सर्व पक्षीयांनी घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. रेंदाळला जिल्हा परिषद व रांगोळी व यळगुड पंचायत समिती उमेदवारी मिळावी अशी मागणी ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींनी आपल्या नेत्यांच्याकडे करावी अशी मागणी कार्यकर्ते करीत आहेत.
– शिवसेना शिंदे गट,भाजपच्या इच्छुकाकडून सोशल मिडिया होर्डींग्जच्या माध्यमातून एक महिन्यापासून प्रचार यंत्रणा सक्रीय केली आहे. स्वाभिमानी महाविकास आघाडीकडून पंचायतसमिती निवडणुकीबाबत कोणतीच हालचाल दिसून येत नाही.
– मतदारसंघ बदलल्यामुळे पंचायत समितीसाठी महायुतीकडून रांगोळीला प्राधान्याने उमेदवारी मिळावी यासाठी आमचे नेते प्रकाश आवाडे व आमदार राहुल आवाडे यांचेकडे मागणी करणार आहे. संगिता नरदे लोकनियुक्त सरपंच रांगोळी
इच्छुक उमेदवार असे – अमोल नांद्रे (प्रकाश आवाडे यांचे पी.ए.) अनिल शिरोळकर ,डॉ. पंकज जंगले, हुमायून मुल्लाणी

शुभकार्य साप्ताहिक राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2025-26 कोरोची येथे घेण्यात आलेल्या
या पुरस्कार सोहळ्यामध्ये ञानगंगा गुरुकुल रांगोळी या प्रशालेस व प्रशिक्षण संस्थेस आदर्श प्रशिक्षण संस्था राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला. त्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन..!





