बळवंत कॉलेज, मध्ये संविधान दिन उत्साहात साजरा
मिरज:-संजय पवार
बळवंत कॉलेज विटा येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आज महाविद्यालयामध्ये दि. २६.११.२०२५ रोजी भारतीय संविधान दिन संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी आपण संविधान स्वीकृत करुन दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली. संविधानाचे महत्व अनेक स्तरांवर असुन भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे. संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे जे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका बजावते.
भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता, तसेच संविधानाची मुल्ये शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच देशाचे भावी नागरिक यांच्यापर्यंत पोहचावीत यासाठी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मध्ये भारतीय संविधानाप्रती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कृतज्ञतेची भावना निर्माण व्हावी या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने सविधान दिनाचे आयोजन विविध उपक्रमाद्वारे केले.
“भारतीयांचा खरा धर्म म्हणजे संविधान असून तो आपल्या अस्तित्वाची, स्वातंत्र्याची समानतेची आणि न्यायाची आठवण करून देणारा आजचा ऐतिहासिक दिवस आहे” असे प्रतिपादन बळवंत काॅलेज विटाचे प्राचार्य डॉ विठ्ठल शिवणकर यांनी केले. संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, भारताच्या राष्ट्रजीवनाला आधार देणारी सर्वात मोठी शक्ती संविधनात असून संविधानामुळे अधिकार,न्याय व संरक्षण मिळाले आहे याची जाणीव सतत भारतीय माणसाला असली पाहिजे त्यासाठी हे कार्यक्रम साजरे केले पाहिजेत.
. कार्यक्रमाचे आयोजन मा. प्राचार्य विठ्ठल शिवनकर यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से.यो समन्वयक प्रा. डॉ. प्रवीण बाबर यांनी केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ प्रवीण बाबर यांनी केले तर प्रतिज्ञा वाचन कनिष्ठ विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा दिलीप जाधव यांनी केले. यावेळी ज्युनिअर विभागाचे पर्यवेक्षक एस ए सावंत, एस एन सावंत,ए पी साळुंखे, ए पी वानकर, एस टी कदम, एन जी गुडघे सौ एस एस मोहिते,मुजमुले आर के,सौ बनसोडे एस ए. यावेळी वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्य राणी किर्दत, कार्यक्रम अधिकारी प्रा.संकेत राठोड प्रा. सौ. रंजना बागल तसेच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व समिती सदस्य व प्रा. मोहसीन आत्तार प्रा. अमोल पवार, प्रा.विश्वजीत डुबल, प्राध्यापिका दिव्या टीकोळे, श्री.सुभाष मेटकरी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





