-10.2 C
New York
Sunday, January 25, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावरील बेस्ट क्लीन अँड ग्रीन कॅम्पस’ पुरस्कार

पॉण्डेचरी : सत्यपाल सिंह आणि डॉ. प्रकाश बाबू यांच्याहस्ते पुरस्कार स्वीकारताना डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. जयेंद्र खोत. समवेत डॉ. प्रतापसिंह देसाई, एम. धनसेकरन आदी.

पॉण्डेचरी येथील परिषदेत आयएसटीईकडून गौरव माजी केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांच्याहस्ते सन्मान कुलसचिव डॉ. जयेन्द्र खोत यांनी स्वीकारला पुरस्कार  

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावरील बेस्ट क्लीन अँड ग्रीन कॅम्पस’ पुरस्कार

तळसंदे-

तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाला इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्लीतर्फे (आयएसटीई) राष्ट्रीय स्तरावरील ‘बेस्ट क्लीन अँड ग्रीन कॅम्पस’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांच्या हस्ते विद्यापीठचे कुलसचिव प्रा. डॉ. जयेन्द्र खोत यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

 

पॉण्डेचरी मधील मनकुला विनयागर अभियांत्रिकी महाविद्यालय येथे शनिवारी आयएसटीईची 55 वी राष्ट्रीय परिषद संपन्न झाली. यावेळी यावेळी आयएसटीईचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई , पॉण्डेचरी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश बाबू, तक्षशिला विद्यापीठाचे कुलपती आणि मनकुला विनायगर एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष एम. धनसेकरन, आयएसटीई राष्ट्रीय कार्यकारी परिषद संचालक प्राचार्य डॉ. महादेव नरके यांच्यासह सर्व संचालक व देशभरातील शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ कॅम्पसचा सर्वांगीण विकास, पर्यावरणपूरक उपक्रम, हरित उपयोजनांचा सातत्यपूर्ण अवलंब आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सर्वोत्तम वातावरण निर्माण करण्याच्या कामगिरीची दखल घेऊन विद्यापीठाचा यावेळी ‘बेस्ट क्लीन अँड ग्रीन कॅम्पस’ने सन्मान करण्यात आला.

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या संकल्पनेतून एकेकाळी ओसाड माळरान असलेला 205 एकरचा हा परिसर आज ऑक्सीजन झोन बनला आहे. विद्यार्थ्याना कृषि क्षेत्रातील विविध प्रयोग करण्यासाठी या ठिकाणी स्वच्छ व पूरक वातावरण उपलब्ध आहे. डॉ. संजय डी. पाटील यांनी तळसंदे कॅम्पसच्या विकासासाठी केलेल्या अथक प्रयत्नांची आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाची विशेष प्रशंसा करण्यात आली.

विद्यापीठाला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. अनिल कुमार गुप्ता यांनी विद्यापीठातील सर्व सहकारी, विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे.

 

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles