भागशाळा इटकरे येथे इयत्ता दहावी विद्यार्थी – पालक – शिक्षक सहविचार सभा संपन्न
कामेरी: स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित, (जि. सांगली) येथील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे विद्यालय कामेरी भाग शाळा इटकरे* येथे एस. एस. सी. विद्यार्थी – पालक – शिक्षक यांची सहविचार सभा शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी संपन्न झाली. *मा. मुख्याध्यापक दिलीपराव चरणे* सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
श्री . सदलगे सर यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषणात इयत्ता दहावी पूर्व परीक्षा, सराव परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, नियोजन, कार्यवाही व अंमलबजावणी याविषयी माहिती दिली. विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री दुधारे सर यांनी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक, नीटनेटकेपणा , अभ्यास ,याविषयी मार्गदर्शन केले. इयत्ता दहावी वर्गाचे वर्गशिक्षक श्री खतीब सर यांनी सत्र परीक्षा एक च्या निकालाचे विश्लेषण करून विद्यार्थ्यांना गणित विज्ञान परीक्षेत कसे मार्क वाढतील याविषयी मार्गदर्शन केले. मा. मुख्याध्यापक दिलीपराव चरणे सर यांनी सत्र परीक्षा एक , प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव केला. येणारे बोर्ड परीक्षेत आपल्या विद्यालयाचे विद्यार्थी व अव्वल यश संपादन करून संस्थेच्या लौकिकात भर घालतील असा विश्वास व्यक्त केला.
विद्यार्थ्याने जीवनात यशस्वी व्हायचे झाले तर आई-वडिलांच्या कष्टाची जाण ठेवली पाहिजे व स्वतः आत्मपरीक्षण करून विद्यार्थ्यांनी अभ्यासात गती घेऊन पुढील 80 दिवसांमध्ये आपल्या उज्वल भवितव्याची पेरणी केली पाहिजे असा आत्मविश्वास विद्यार्थ्यांच्या मनात भरला. पालकांच्या मधून निर्माण झालेल्या प्रश्नांचे अतिशय मार्मिक भाषेमध्ये निराकरण करून पालक विद्यार्थी शिक्षक यांच्यात सुसंवाद ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त केली. या सभेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी श्री नांगरे मामा इयत्ता दहावीचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व त्यांचे पालक उपस्थित होते.





