
रत्नागिरी विजेता, उपविजेता सिंधूदुर्ग विभागीय १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा संपन्न
नवे पारगांव:
येथील सरपंच स्टेडियमवर झालेल्या विभागीय स्पर्धेत विजेतेपद पटकाविलेल्या रत्नागिरी संघास चषक देताना राज्य क्रिडा मार्गदर्शक सीमा पाटील, पंच शिवाजी कामते, राम कांबळे, मिहीर देवपुजे, हेलन फर्नांडीस, काॅंट्रॅक्टर अमोल चव्हाण, मुख्याध्यापक संजय पाटील, प्रल्हाद पाटील आदी. दुसऱ्या छायाचित्रात उपविजेत्या सिंधूदुर्ग संघ.(छायाचित्र- दीपक पाटील, चावरे)
—-
नवे पारगाव, ता.२६: नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील सरपंच स्टेडियमवर झालेल्या शालेय मुलांच्या विभागीय क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात
रत्नागिरी जिल्ह्याच्या संघाने एकतर्फी विजय मिळवित विजेतेपद पटकाविले. त्यामुळे सिंधूदुर्ग संघाला उपविजेतेपदावर क्रमांकावर समाधान मानावे लागले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परीषद व विभागीय क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूरच्यावतीने जिल्हा क्रिडाधिकारी विद्या शिरस या़च्या मार्गदर्शनाखाली चावराई माध्यमिक विद्यालय चावरे, विंग्ज स्पोर्टस ॲकॅडमी नवे पारगांव, ग्रामपंचायत नवे पारगांव यांच्या संयोजनाखाली नवे पारगांव येथील सरपंच क्रिकेट मैदानावर कोल्हापूर विभागीय १४ वर्षाखालील शालेय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा झाल्या.
कोल्हापूर, सांगली, सातारा,रत्नागिरी, सिंधूदुर्ग जिल्ह्यातील आठ संघ सहभागी झाले होते.
आज रत्नागिरी व सिंधूदुर्ग जिल्ह्या दरम्यान अंतिम सामना झाला. रत्नागिरी जिल्ह्याचे नेतृत्व श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मीडियम स्कूलने तर
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेतृत्व परशुराम नाईक हायस्कूल सोनोली या संघाने केले.
दोन्ही संघा दरम्यान आठ षटकंचा सामना घेण्यात आला. आज संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रत्नागिरीने फलंदाजी करताना केवळ एक विकेट गमावत ४८ बाॉलमध्ये तब्बल १३४ धावांचा डोंगर केला. यामध्ये देवांग गुरवने केवळ २९ बाॅलमध्ये १५ चौकार ठोकत ६९ धावा केल्या. सिंधूदुर्ग संघाहमोर १३५ धावांचे लक्ष्य असताना या संघाने निर्धारीत आठ षटकात ४ गड्यांच्या बदल्यात केवळ ६६ धावा केल्याने रत्नागिरी संघ ६९ धावांनी विजयी झाला.
मैदानावरच पारीतोषिक वितरण सोहळा झाला. सामनावीर व बेस्ट बॅटसमॅन रत्नागिरीचा देवांग गुरव, बेस्ट बाॅलर वेदा़त पाटील (सिंधूदुर्ग), मालिकावीरचा बहुमान कर्णधार आराध्य मोंडकर (रत्नागिरी) यांना देण्यात आला. विजेता रत्नागिरी व उपविजेत्या सिंधूदुर्गला चषक राज्य क्रिडा मार्गदर्शक सीमा पाटील, काॅंट्रॅक्टर अमोल चव्हाण, निवड समिती सदस्य, पंच शिवाजी कामते, राम कांबळे, हेलन फर्नांडीस, मिहीर देवपुजे, मुख्याध्यापक संजय पाटील, प्रथमेश डंबे, प्रल्हाद पाटील, मयूर ओझा, दिपक पाटील यांच्या हस्ते झाले.





