-10.8 C
New York
Sunday, January 25, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

महाराष्ट्राचे लोकदैवत ‘श्रीखंडोबा’ अर्थात ‘श्रीमार्तंडभैरव’

महाराष्ट्राचे लोकदैवत ‘श्रीखंडोबा’ अर्थात ‘श्रीमार्तंडभैरव’

सत्याचा शिलेदार महाराष्ट्र राज्य विशेष प्रतिनिधी डॉ. उमेश सुतार

‘श्रीमल्हारी-मार्तंडभैरव’ तथा श्रीदेव ‘खंडोबा’ विषयी…

सज्जनांचे रक्षण व दुर्जनांचा नाश करण्यासाठी परमेश्वर अवतार घेत असतो. त्यानुसार, मणी व मल्ल या राक्षसांना यमसदनी धाडण्यासाठी श्रीशंकराने ‘मार्तंड’ अवतार धारण केला.

या अवतारात शिवाने ‘खांडा’ नामक तलवार हाती घेतली. त्यामुळे, खांडा धारण करणारा हा शिवमार्तंड ‘खंडोबा’ या नावाने ओळखला जाऊ लागला. म्हाळसेचा पती म्हणून यास ‘म्हाळसाकांत’ म्हणूनही ओळखले जाते. शिवाय ‘मल्हारी मार्तंड’ किंवा ‘मार्तंड भैरव’ असेही याचे नाव आहे.

खंडोबा हे कर्नाटक प्रांताचे मूळ दैवत असून ते कर्नाटक मधूनच महाराष्ट्रात आले. कर्नाटक प्रांतात ‘सात’ या संख्येला ‘येळू’ असे म्हणतात. ज्याचे सैन्य सात कोटी आहे, तो ‘येळकोट’ शिवाय तो चांगला आणि भला म्हणजेच ‘चांगूभली’ आहे. खंडोबाच्या या कर्नाटकी वर्णनावरून खंडोबाच्या नावाने ‘येळकोट’ आणि ‘चांगभलं’ हे ‘तळी भरतानाचे’ शब्द महाराष्ट्रात देखील रूढ झाले.

 

कैलासाधिपती श्रीशंकराने हा मार्तंडावतार ‘खंडोबा’ या नामाभिधानाखाली का व कसा धारण केला आणि त्याचे माहात्म्य काय आहे याचे वर्णन संस्कृत भाषेतील मूळ ‘मल्लारीमाहात्म्य’ या ग्रंथातून पुढील प्रमाणे आलेले आहे.

 

मणी मल्लासुर जन्माची पूर्वपिठिका :

वैकुंठामध्ये विष्णूच्या

कर्णमळापासून ‘मधू’ व ‘कैठभ’ या दोन आसुरांचा जन्म झाला. जन्मतःच हे दोन्ही असुर सर्व देवदेवतांसोबत युद्धासाठी सज्ज झाले होते. हजारो वर्षे युद्ध होऊनही या दोघांना मारणे कोणत्याही देवास शक्य झाले नाही. भगवान श्रीविष्णूने मात्र या दोघांनाही वचनी गुंतवून त्यांचा शिताफीने वध केला. परंतु, वध होण्याअगोदर असुरांनी भगवंताकडे शिव व शक्ती यांचे सोबत युद्ध करण्याची इच्छा प्रकट केली. तेव्हा श्रीविष्णूने त्यांना ‘पुनर्जन्मामध्ये तुमची इच्छा पूर्ण होईल’ असा वर दिला.

कालांतराने श्रीविष्णूच्या त्या वराची प्रचिती घेत ‘शुभ’ व ‘निशुंभ’ हे दोन असुर जन्माला आले. संपूर्ण ब्रह्मांडास उपद्रवी उरलेले हे असुर पुढे आदिमाया आदिशक्ती पार्वतीसोबत निकराने केलेल्या युद्धामध्ये मारले गेले. त्यामुळे त्यांची शक्तीसोबत शिवाशी दोन हात करण्याची इच्छा तशीच राहिली.

याचाच परीणाम म्हणून, शिवशंकरासोबत युद्ध करण्याची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याकरीता कृतयुगामध्ये शुभ व निशुंभाने पृथ्वीतलावरील ‘मणीचूल’ पर्वतावर ‘मणी’ व ‘मल्लासुर’ या नावाने पुन्हा जन्म घेतला. मणीचूल पर्वताच्या सांनिध्यात ‘मणिपूर’ नगर वसवून तेथे ‘मणी’ व ‘मल्लासुर’ राज्य करू लागले.

 

कालांतराने या दोन असुरांनी घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवास प्रसन्न करून घेतले. सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेवच यांचेवर प्रसन्न झाल्यामुळे हे दोघेही भाऊ अतिशय उन्मत्त झाले. पृथ्वीतलावरील ऋषिमुनींचा ते छळ करू लागले. त्यांच्या राज्यात ऋषिमुनींना धार्मिक कार्य करणे अवघड होऊन बसले. सामान्यजनांना त्राता उरला नाही. सर्वांचाच अमानुष छळ होऊ लागला.

 

मणीचूल पर्वत : गर्वाने उन्मत्त झालेला मल्लासुर शिकारीसाठी

मणीचूल पर्वताकडे निघाला. याच पर्वतावर सात ऋषींचे आश्रम होते. धर्माचे रक्षण करणारे हे धर्मपुत्र लतावेलींनी नटलेल्या निसर्गरम्य परिसरामध्ये धार्मिक कर्मकांड करून आनंदाने जीवन व्यतीत करीत होते. मात्र नियतीला हे मंजूर नसल्याकारणाने या

शिकारीला निघालेल्या मल्लासुराचे लक्ष सप्तऋर्षीच्या आश्रमांकडे गेले.

ऋषिमुनींविषयी मनामधे अत्यंत चीड असलेल्या मल्लासुराने सैनिकांना त्यांचे आश्रम उध्वस्त करण्याचा आदेश दिला. क्षणापूर्वी जिथे स्वर्ग होता त्या परिसरास स्मशानकळा आली. ऋषिमुनींच्या पत्नी व लहान मुले असुरांच्या अत्याचारात भरडले गेले. यज्ञ वेदीका मलमूत्राने भ्रष्ट करण्यात आल्या. सर्वत्र हाहाकार माजवून मल्लासूर निघून गेला.

सत्य व नीतीने वागणाऱ्या धर्मपुत्रांनी हे आपले प्रारब्धभोग असावेत असा विचार करून त्यांच्या व्यथा नारदमुनींना सांगितल्या आणि दुष्ट, कपटी अशा मणी-मल्लासूराच्या त्रासापासून वाचविण्याची विनंती केली. त्यावर नारदमुनींनी त्यांना देवेंद्राकडे जाण्यास सांगितले आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांच्या कुटुंबियांना मणीचूल पर्वतापासून काही योजने दूर असलेल्या धवलगिरी पर्वताच्या उत्तरेस ठेवण्यास सांगितले. हा सुरक्षित परिसर धावडदरे म्हणून परिचित होता. हा धावडदरे परिसर दुर्वासऋषर्षीनी, त्यांचा प्रिय शिष्य लव याच्या तपश्चर्येत अडथळा येऊ नये म्हणून अघोरी व असुरी शक्तींपासून निर्भय केला असल्यामुळे या धावडदरा व मोरदरा परिसरात आपल्या कुटुंबांना ठेवून सप्तऋषी निश्चित मनाने इंद्रनगरीकडे प्रयाण करते झाले.

इंद्रनगरीकडे प्रयाण : नारदमुनींच्या सांगण्यानुसार सप्तऋषी (धर्मपुत्र) इंद्र दरबारात जाऊन पोहोचले. त्यांना पाहून इंद्राला फार आनंद झाला. इंद्रसभेतील सूर्य, चंद्र, वायू, यम, गुरुदेव बृहस्पती

आदी देवही प्रऋषिमुनींच्या दर्शनाने आनंदीत झाले. रत्नजडित सिंहासनावरून उठून इंद्रदेव मुनींच्या स्वागतास पुढे झाले, त्यांचा योग्य रितीने आदरसत्कार करून त्यांना आसन ग्रहण करण्यास सांगितले व स्वर्गात येण्याचे कारण विचारले. धर्मपुत्रांनी इंद्रदेवास नमस्कार करून त्यांच्यावर झालेले अतोनात अत्याचार व मणीमलासुरांनी चालविलेल्या छळवादाचे विस्तृत वर्णन केले, तसेच धर्मपुत्रांनी इंद्राची स्तुती करीत, त्यांच्यावर करण्यात आलेल्या अत्याचाराविषयी उपाययोजना करावी आणि मणीमल्लासुरांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी देवेंद्राकडे विनंती केली.

 

धर्मपुत्र सप्तऋषर्षीची व्यथा जाणून घेत देवेंद्र त्यांस म्हणाला, ‘मणी-मल’ या दोघा बंधूनी पायाच्या एका अंगठ्धावर उभे राहून घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवास प्रसन्न करून घेत अगाध शक्ती प्राप्त करून घेतली आहे. तेव्हा त्यांना मारण्यासाठी मी असमर्थ आहे. मात्र मी आपणां समवेत येतो. आपण भगवान श्रीविष्णू यांना याविषयी अवगत करु, भगवंत यावर काहीना काही उपाय काढून मणी-मल्लांचा नाश करतील असे सुचविले.

 

वैकुंठपुरी : इंद्रदेवासह सप्तऋषींनी वैकुंठपुरीत प्रवेश केला. तेथील वैभव व सौंदर्य पाहून ऋषींचे डोळे दिपले. सप्तऋषर्षीकरिता तर, त्यांच्या सर्व व्यथांचा विसर पडावा असे ते अलौकिक वैभव होते. विष्णुपूरात आल्यानंतर शेषनागावर विसावलेल्या लक्ष्मीनारायणासमोर नतमस्तक होऊन सप्तऋषींनी त्यांना विनम्र प्रणाम केला. भगवान श्रीविष्णूंनी सप्तऋषीसह देवेंद्राचे स्वागत करून त्यांचे योग्य ते आदरातिथ्य केले व वैकुंठपुरीत येण्याचे कारणविचारले. त्यावर ऋषिमुनींनी त्यांच्यावर ओढवलेल्या संकटाचे व मणी-मल्ल यांनी चालविलेल्या अत्याचाराचे कथन केले आणि या संकटापासून मुक्ती देण्याची विनंतीही केली. मात्र, भगवान श्रीविष्णूंनीही त्यांना ‘आपण या दोन आसुरांना संपविण्यास असमर्थ असल्याचे’ सांगितले. ‘मणी-मल्ल यांना फक्त कैलासाधिपती श्रीशंकरच मारु शकतील तेव्हा आपण सर्वजण कैलासापर्वती जाऊन श्रीशंभूमहादेवास ‘मणी-मल्लासुरांचा बंदोबस्त करावा’ अशी विनंती करू,’ असे सांगून श्रीविष्णू देखील इंद्रदेव व सप्तऋर्षीसह कैलासपर्वताकडे जाण्यास निघाले.

 

कैलास पर्वतावर आगमन: कैलास पर्वत पाहून ऋषिमुनींना अतिशय धन्य वाटले. सर्वत्र विविध प्रकारची उद्याने व अमृतकुंडे होती. गंधर्वांचे सुमधुर गायन ऐकू येत होते. शिवगणांचा महिमा ऐकून ऋषिमुनींना श्रीशंकराच्या दर्शनाची उत्सुकता लागून राहिली होती. भगवान श्रीविष्णू, देवेंद्र व सप्तऋषी यांनी सर्वप्रथम जयनंदीची भेट घेतली व त्याला श्रीशंकरांची भेट घेण्यामागचे प्रयोजन सांगितले. त्यानंतर जयनंदी त्या सर्वांना घेऊन श्री शंकराकडे गेले.

 

बर्फाच्छादित पर्वतराजीत व्याघ्रांबरोबर श्रीशंकर आसनस्थ झाले होते. त्यांच्या हातामध्ये व गळ्यात रूद्राक्षांच्या माळा, गळ्याभोवती नागभूषण, मनगटावर सर्प कंकणे व गळ्यात रूंडमाळ शोभत होती. पंचमुखी भोलानाथाच्या सर्वांगास चंदन विलेपित केले होते. व्याघ्रांबरधारी श्रीशिवशंकराचे हाती परशू, अंकुश, त्रिशूळ, डमरू, धनुष्यबाण, खड्ग, खटवांग, शिंग, हरिण व पाणपात्र ही आयुधे होती. श्री महादेव प‌द्मासन घालून ध्यानस्थ

बसले होते, नानाविध अलंकाराचे तेज जिच्यापुढे निष्प्रभ व्हावे अशी माता पार्वती श्रीशंकराजवळ बसलेली होती. या उमा-महेशास पाहून सप्तऋर्षीनी शिवस्तुती करण्यास सुरुवात केली.

स्तुती ऐकून भोलानाथ प्रसन्न झाले आणि त्यांनी सर्वांना कैलासावर येण्याचे कारण विचारले. त्यावर मणिमल्लासुरांनी केलेले अत्याचार व धर्मपुत्रांविषयी झालेला अन्याय याचा समग्र वृत्तांत जयनंदीने श्रीशंकरास कथन केला आणि मणी-मल्लासूर हे दोन असुर पृथ्वीतलावर चालणाऱ्या धार्मिक कर्मकांडात कशा प्रकारे विघ्न आणीत आहेत. याचे वर्णन करून या दोन आसुरांना योग्य ते शासन करण्याची विनंती केली.

 

जयनंदीचे बोलणे ऐकून श्री शंकर भगवान म्हणाले, “मणी व मल्ल या दोन असुरांनी तुम्हांला जो त्रास दिला आहे त्याचे फळ त्यांना भोगावे लागणार आहे हे निश्चितच. त्यांनी तुम्हांला त्रास दिला नसून मला त्रास दिलेला आहे. तेव्हा त्यांचे निर्दालन होणारच यात तिळमात्र शंका नाही.” असे बोलून शिव क्रोधाने उभे राहिले, तसा डमरूचा नाद कैलासपर्वतावर घुमू लागला. श्रीमहादेव तांडवनृत्य करू लागले. त्याच्या नेत्रातून अग्नी प्रज्वलित झाल्याचा भास होऊ लागला.

 

भयंकर क्रोधायमान झालेल्या श्रीशंकराने आपल्या जटा जवळच्या खडकावर आपटल्या त्याक्षणी त्यातून अतिशय उग्र व अक्राळ-विक्राळ अशा ‘महामारी’चा जन्म झाला. या भयंकर क्रोधायमान महामारीस ऋषिमुनींनी घृत (तुपाने) शिंपून शांत केले. ती शांत झाल्यावर तिचे ‘घृतमारी’ असे नामकरण केले. या नंतरश्रीशंकराने धर्मपुत्रांना सांगितले की, ‘ज्या कार्यासाठी आपण माझ्याकडे आला आहात ते सफल होणार आहे. या धरतीमातेची मणी व मल्ल या असुरांच्या कचाट्यातून मुक्तता होणार आहे.’ श्रीशंकराच्या या वक्तव्याने धर्मपुत्रांसह भगवान श्रीविष्णू व इंद्रदेव देखील आनंदीत झाले,

श्रीमार्तंडभैरव अवतार सप्तक्ऋषींना दिलेल्या वचनानुसार

चैत्र पौर्णिमेला दुसन्या प्रहरी चित्रा नक्षत्रामध्ये श्रीशंकराने भव्य-दिव्य रूप धारण केले. शिवाचे तेज सूर्याप्रमाणे प्रखर, जणू ते ‘मार्तंडाचे प्रतिबिंब’ असावे असा भास झाला. हा अवतार धारण केल्यानंतर त्याने मोठी गर्जना केली त्यामुळे त्याचे ‘मार्तंड भैरव’ असे नामकरण करण्यात आले, सर्वांनी त्याला साष्टांग नमस्कार घालून त्याची स्तुती व प्रार्थना केली की, ‘तुझे हे रूप सर्वांना सुखकारक व मंगलमय होवो.’ त्यानंतर सर्वांनी ‘सदानंदाचा यळकोट’ हा जयघोष केला. ‘मार्तंड भैरव’ अवतार धारण केल्यावर भगवंताने सर्व देव-गणांना युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles