नाधवडेच्या जयवंतराव वायदंडे यांच्या घरी संविधान दिन उत्साहात साजरा…

पत्रकार :- सचिन लोहार
बुधवार 26 नोव्हेंबर रोजी भुदरगड तालुक्यातील नाधवडे गावचे सामाजिक कार्यकर्ते,महाराष्ट्र राज्य कलाकार समन्वयक समितीचे समन्वयक आणि अखिल भारतीय कलाकार एकता महासंघाचे अध्यक्ष श्री.जयवंतराव वायदंडे यांच्या घरी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शिवशाहीर,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे परिषदेचे अध्यक्ष डॉ.राजीव चव्हाण सर यांच्या हस्ते संविधान प्रतिमा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.डॉ.चव्हाण यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. डॉ .चव्हाण यांनी सुरेल संगीताच्या सहवासात संविधान , भीमगीते पोवाडा सादर केली.
याच दरम्यान उपस्थित सर्वांना संविधान चित्रफित दाखविण्यात आली.यावेळी संविधानाचे महत्त्व,त्याची आवश्यकता आणि गरज यावर सखोल चर्चा घडून आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संदीप कांबळे सर यांनी केले.आभार श्री. तायाप्पा कांबळे यांनी मानले.या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते जयवंत वायदंडे,सिद्धांत सुपल, उदय कांबळे, सामाजिक कार्यकर्ते तायाप्पा कांबळे,कोंडीबा कांबळे,विजय कांबळे रोजगार सेवक,संदीप कांबळे सर, पांडुरंग वैराट,आदित्य पाटील,नुपूर वायदंडे, राजवैष्णवी वायदंडे राजवर्धन वायदंडे, नितीन कांबळे,अमित कांबळे,शिवाजी वायदंडे नेताजी वायदंडे,रवी वायदंडे,हर्षवर्धन कांबळे,विघ्नेश कांबळे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.





