नवे पारगावात मंगळवारपासून कोल्हापूर विभागीय १४ वर्षाखालील शालेय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा
कोल्हापूरसह पाच जिल्ह्यातील संघ होणार सहभाग
नवे पारगांव येथील सरपंच क्रिकेट मैदानावर विभागीय स्पर्धा होणार आहेत.
—–
नवे पारगाव, ता.२४: नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथे मंगळवार (ता.२५) पासून कोल्हापूर विभागीय १४ वर्षाखालील शालेय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा सुरु होणार असून या स्पर्धेत
कोल्हापूरसह पाच जिल्ह्यातील संघ सहभागी होणार आहेत.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परीषद व विभागीय क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूरच्यावतीने चावराई माध्यमिक विद्यालय, चावरे, विंग्ज स्पोर्टस ॲकॅडमी नवे पारगांव, ग्रामपंचायत नवे पारगांव यांच्या संयोजनाखाली नवे पारगांव (ता. हातकणंगले) येथील सरपंच क्रिकेट मैदानावर होणार आहेत.
मंगळवारी सकाळी ९ वाजता विभागीय क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन होणार आहे. या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी सिंधूदुर्ग या जिल्ह्यातील मुलांचे संघ सहभागी होणार आहेत.





