बजरंग उर्फ मारुती मोहिते यांचे अल्पशा आजाराने निधन
नवे पारगाव वार्ताहर
तळसंदे ता. हातकणंगले येथील माजी ग्रामपंचायत सदस्य, शाहू सहकारी दूध संस्थेचे व तळसंदे पारगाव सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक बजरंग उर्फ मारुती शंकर मोहिते (वय८१ वर्ष) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
ते ग्रामपंचायत सदस्य किरण मोहिते यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (दि. 25 )रोजी सकाळी नऊ वाजता आहे.





