-10.8 C
New York
Sunday, January 25, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य तर्फे संगणक प्रमाणपत्र वाटप सोहळा संपन्न 

ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य तर्फे संगणक प्रमाणपत्र वाटप सोहळा संपन्न 

 

पुणे जिल्हा प्रतिनिधी सदाशिव रणदिवे

 

दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी महात्मा फुले विकास महामंडळ तर्फे अनुसूचित जाती (एससी) या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण व तीन हजार रुपये स्कॉलरशिप मंडळ तर्फे देण्यात येते या मंडळा अंतर्गत TM e2E Academy pvt ltd Hyderabad व ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य तर्फे 60 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यातील 40 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.स्वातीताई पवार विद्यमान सरपंच गोपाळवाडी दौंड या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नानवीज पोलीस ट्रेनिंग सेंटर पीआय श्री.नितीन बोधे सर यांनी संगणक साक्षर व्हायला हवे संगणक शिकणे ही काळाची गरज आहे जगाबरोबर चालायचे असेल तर संगणक शिकणे अतिशय आवश्यक आहे असे आव्हान या कार्यक्रमा वेळी केले त्यानंतर मंगेश मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सुरवडे सर यांनी संगणका बद्दलचे महत्त्व जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांना संबोधित केले तसेच या कार्यक्रमाच्या वेळी मा. सरपंच श्री जयसिंग दरेकर गोपाळवाडी ,ग्रामपंचायत सदस्य सौ.वैशालीताई शिंदे पत्रकार श्री राजेंद्र सोनवलकर,,गोपाळवाडी ग्रामपंचायतचे मा. तंटामुक्त अध्यक्ष भीमराव चोरमले ,रोटरी क्लबचे सदस्य चांगदेव शेलार ,श्री गणेश हाके श्री सुरेश काळे श्री रघुनाथ सुळ श्री शरद धेंडे , श्री अजय बनसोडे प्रथमेश रणदिवे इत्यादी मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली या कार्यक्रमाचे आयोजन श्री सदाशिव रणदिवे संस्थापक अध्यक्ष यांनी केले यावेळी संस्थेची माहिती देण्यात आली संस्थेच्या वतीने कॅम कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर ,इरा किड्स प्ले स्कूल, प्रगती मॉन्टेसरी कोर्स इत्यादी उपक्रम सुरू आहेत तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन , विशेष प्रस्ताविक व विशेष सहकार्य एडवोकेट श्री .किशोर टेकवडे यांनी केले व आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व प्रमुख पाहुण्यांचे आभार संस्थेच्या सचिव सौ.वैशाली रणदिवे मानले

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles