-10.8 C
New York
Sunday, January 25, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

डी वाय पाटील कृषी महाविद्यालयाच्या दोन माजी विद्यार्थ्यांचे राज्यसेवा परीक्षेत यश     

डी वाय पाटील कृषी महाविद्यालयाच्या दोन माजी विद्यार्थ्यांचे राज्यसेवा परीक्षेत यश     

तळसंदे :महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा (राजपत्रित वर्ग–1) परीक्षेत डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदेच्या दोन माजी विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेत मयूर संजय पवार व स्नेहल किसन गावडे या दोघांनी राज्यसेवा (राजपत्रित वर्ग–1) परीक्षा उत्तीर्ण केली. माजी विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डी. एन. शेलार यांनी त्यांचे अभिनंदन केले. प्राचार्य शेलार म्हणाले, महाविद्यालयातर्फे स्पर्धा परीक्षासाठी मार्गदर्शन आणि विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. त्यामुळे अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत उच्च पदांवर कार्यरत आहेत. कष्ट, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर या दोघांनी मिळवलेले यश इतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल.

महाविद्यालयातील प्राध्यापक व माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन आणि वेळोवेळी मिळणारी प्रेरणा तसेच आई-वडिलांचे पाठबळ यामुळे या परीक्षेत यश संपादन केल्याचे दोघांनी सांगितले.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज संजय पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles