सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सह.पतसंस्थेच्या चेअरमन पदी सौ.निलम दळवी, व्हा. चेअरमन पदी श्री.दिपक शेस्वरे,यांची बिनविरोध निवड.
मिरज:- संजय पवार
सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सह.पतसंस्थेच्या चेअरमन पदी सौ.निलम महादेव दळवी, वानलेसवाडी हाय. अँड ज्युनि. कॉलेज, वानलेसवाडी, तर व्हा. चेअरमन पदी श्री.दिपक बपू शेस्वरे, कै.ग.रा.पुरोहित कन्या प्रशाला,सांगली यांची बिनविरोध निवड झाली. आज दिनांक १७ रोजी चेअरमन व्हा.चेअरमन निवडीची सभा संस्थेच्या प्रधान कार्यालय विश्रामबाग सांगली येथे पार पडली अध्यासी अधिकारी म्हणून श्री.गणेश एस. काटकर,अधिक्षक, जिल्हा उपनिबंधक ,सहकारी संस्था सांगली यांनी चेअरमन व्हा.चेअरमन निवडी घोषित केल्या .यावेळी सौ.निलम दळवी, व्हा. चेअरमन श्री.दिपक शेस्वरे यांनी सभासदांना चांगली सेवा देऊन संस्थेचा नावलौकिक वाढवण्याची ग्वाही दिली.तसेच ठेवी व सभासद संख्या वाढीसाठी प्रयत्न करणार असलेचे सांगितले.या निवडी नंतर चेअरमन,व्हा.चेअरमन यांचा सत्कार करणेत आला. निवडीवेळी मार्गदर्शक श्री.आर.के.पाटील सर, श्री.जे.के. खराडे सर, श्री.अर्जुन पाटील सर,श्री. बी.एम. पाटील सर, श्री.बी.बी.पाटील सर, श्री.सी.वाय. जाधव सर, आर. के. जगताप सर, संस्थेचे सर्व संचालक, कर्मचारी इतर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी संस्थेचे ऑन.सेक्रेटरी श्री निशांत जाधव यांनी आभार मानले.





