नागजच्या आदर्श प्रशालेचे मुख्याध्यापक संजयकुमार झांबरे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
मिरज:- संजय पवार
सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघाचे नूतन अध्यक्ष, आदर्श प्रशाला नागजचे मुख्याध्यापक व आमचे मार्गदर्शक श्री. संजयकुमार झांबरे सर यांना शनिवार दिनांक 1 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबई येथील,आशिया खंडातील सर्वात मोठी असलेली माध्यमिक शिक्षकांची पतसंस्था,सेकंडरी एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी च्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान करणेत आला . यावेळी पुरंदर -हवेली चे मा. आमदार श्री .संजय जगताप साहेब , विधान परिषदेचे सदस्य आमदार श्री. विक्रम पाटील सर, सहकार भारतीचे संस्थापक सदस्य ,भारतीय रिझर्व बँकेचे सल्लागार सदस्य श्री . सतिश मराठे साहेब, आमदार श्रीकांत भारतीय,आणि सेकंडरी क्रेडिट सोसायटीचे चेअरमन डॉ.श्री चंद्रकांत पाटील सर व सर्व संचालक व राज्यभरातून आलेले सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते . हा पुरस्कार सोहळा मुंबई येथील महाकवी कालिदास नाट्य मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला.





