1.4 C
New York
Sunday, March 29, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

“शिवभोजन योजनेला राज्यभर आर्थिक झळ; कोल्हापूर जिल्ह्यात ३ कोटींचे अनुदान थकले

 

मुबंई :राज्यातील गरीब, कामगार आणि विद्यार्थ्यांना कमी दरात पोषक आहार मिळावा म्हणून सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी योजना सध्या आर्थिक अडचणीत सापडली आहे. राज्यातील सुमारे १,८०० केंद्रांमध्ये दररोज लाखो थाळ्या दिल्या जातात. मात्र, शासनाकडून मिळणारे अनुदान गेल्या काही महिन्यांपासून थकीत राहिल्याने अनेक केंद्रे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. विविध वृत्तांनुसार, राज्य शासनाकडे एकूण सुमारे ₹२०० कोटींचे अनुदान थकीत असून, केंद्रचालकांना पगार, भाडे व अन्नधान्य पुरवठा यांचे देणे देणे अवघड झाले आहे.

या आर्थिक तुटवड्याचा परिणाम कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक जाणवतो आहे. जिल्ह्यात सध्या ५३ शिवभोजन केंद्रे कार्यरत असून, दररोज सुमारे ६,१०० थाळ्या गरजू नागरिकांना पुरवल्या जातात. या केंद्रांसाठी दरमहा सुमारे ₹६० लाखांचे खर्च येतात. मात्र, गेल्या पाच महिन्यांपासून शासनाकडून अनुदान न मिळाल्याने अंदाजे ₹३ कोटी रुपयांची थकबाकी निर्माण झाली आहे. अनेक केंद्रचालकांना स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागत आहे, तर काही ठिकाणी केंद्रे बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

 

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles