22.4 C
New York
Thursday, March 26, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

सातवे हायस्कूल, सातवे१९९७-९८ च्या १०-वी बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न.

सातवे सातवे हायस्कूल सातवे १९९७ -९८च्या बॅचचे विद्यार्थी विद्यार्थी व शिक्षक एकत्र

27 वर्षाने एकत्र आले विद्यार्थी शिक्षक एकत्र.

 

सातवे प्रतिनिधी:

सातवे तालुका पन्हाळा येथील सातवे हायस्कूलच्या १९९७-९८ च्या १०-वी बॅचचा माजी विद्यार्थी आणि शिक्षक स्नेहमेळावा नुकताच उत्साहात पार पडला. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि आपापसातले स्नेहबंध अधिक घट्ट करण्यासाठी शाळेच्या प्रांगणात हा भावपूर्ण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

शाळेच्याच परिसरात हा स्नेहमेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमाला १९९७-९८ बॅचचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या स्नेहमेळाव्यासाठी शाळेतील माजी आणि विद्यमान शिक्षकांची उपस्थिती लाभली, ज्यामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बी. डी. पाटील उपस्थित होते. त्यांच्यासह एस. बी. पाटील, संजयसिंह यादव, अर्जुन एवाळे, आप्पासाहेब साळुंखे, संभाजी शिंगे, बाळासाहेब नंदुरकर आणि विद्यमान मुख्याध्यापक अशोक कांबळे, शारदा बांडे इत्यादी मान्यवर शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शिक्षकांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल आनंद व्यक्त केला. प्रमुख पाहुणे बी डी पाटील यांनी मार्गदर्शन करताना, विद्यार्थ्यांनी शाळेने दिलेले संस्कार आयुष्यभर जपावेत आणि समाजासाठी योगदान द्यावे असे आवाहन केले. विद्यमान मुख्याध्यापक कांबळे यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील किस्से आणि अनुभव कथन केले. २७ वर्षांपूर्वीचे विद्यार्थी आणि शिक्षक पुन्हा एकत्र आल्यामुळे शाळेच्या परिसरात आनंदी आणि भावूक वातावरण निर्माण झाले होते. ‘आपला स्नेहमेळावा, आपल्या मैत्रीचा उत्सव!’ या घोषणेप्रमाणे हा सोहळा खऱ्या अर्थाने एक अविस्मरणीय मेळावा ठरला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी १९९७-९८ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

 

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles