डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पसच्या अजयराजची आंतर विभागीय जलतरण स्पर्धेसाठी निवड
तळसंदे :
कोल्हापूर विभागीय क्रीडा परिषद अंतर्गत आयोजित शिवाजी विदयापीठ विभागीय जलतरण स्पर्धेत 200 मीटर बटर फ्लाय व 200 मी ब्रेस्ट स्ट्रोक या प्रकारात तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या अजयराज जाधव याने तृतीय स्थान मिळवले आहे. या यशामुळे आंतरविभागीय जलतरण स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.
राजश्री छ. शाहू कॉलेज कोल्हापूर येथे या स्पर्धा संपन्न झाल्या. स्पर्धेसाठी देवचंद कॉलेज अर्जुननगर , डीकेटीइ इचलकरंजी, घाळी कॉलेज गडहिंग्लज,विवेकानंद कॉलेज कोल्हापूर, डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेज साळोखेनगर, शाहू कॉलेज, डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पस तळसंदे आदी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये 200 मी बटर फ्लाय व 200 मी ब्रेस्ट स्ट्रोक या खेळ प्रकारात डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पस मधील विद्युत अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिकत असलेला अजयराज जाधव याने तिसरा क्रमांक मिळवत राजश्री छ. शाहू कॉलेज कोल्हापूर येथे होणाऱ्या अंतरविभागीय जलतरण स्पर्धेसाठी पात्र झाला.
डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचे डायरेक्टर डॉ. सतिश पावसकर यांनी अजयराज जाधव आणि जिमखाना प्रमुख श्री विनोद उतळे यांचे अभिनंदन केले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, विश्वस्त तेजस पाटील, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांचे प्रोत्साहन लाभले.





