किणी (हातकणंगले) येथे ‘लक्ष्मी सरस्वती’ पतसंस्थेचा रौप्यमहोत्सव उत्साहात; आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते भेटवस्तू वाटप
किणी (हातकणंगले): किणी (ता. हातकणंगले) येथील श्री लक्ष्मी सरस्वती महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना भेटवस्तू वाटप समारंभ उत्साहात पार पडला. आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते संस्थेच्या सर्व सभासदांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार डॉ. विनय कोरे यांनी पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणामध्ये संस्थेने दिलेल्या योगदानाचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला विटा मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन विनोदराव गुळवणी, महेंद्रसिंह चव्हाण, हिम्मत बहाद्दर सरकार किणी, संस्थेचे संस्थापक ॲड. एन. आर. पाटील, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय धनवडे, वारणा दूध संघाचे संचालक राजवर्धन मोहिते, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या पुष्पाताई आळतेकर, हर्षद पाटील, वारणा बझारचे संचालक अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेच्या अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्षा संगिता पाटील, सचिव शबाना सुतार यांच्यासह सर्व संचालक मंडळ आणि मोठ्या संख्येने सभासद यावेळी उपस्थित होते. संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या यशस्वी वाटचालीस उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.





