डॉ. डी. एस. घुगरे यांचा मुख्याध्यापक महामंडळाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात विशेष गौरव
कराड: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, मुंबईच्या ६४ व्या राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशनात मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष आणि आदर्श गुरुकुल शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. डी. एस. घुगरे सर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. डॉ. घुगरे सर यांच्या शिक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल हा गौरव करण्यात आला.
कराड येथील यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, विद्यानगर येथे दि. २५ व २६ ऑक्टोबर २०२५ रोजी अत्यंत यशस्वीपणे पार पडलेल्या या अधिवेशनात डॉ. घुगरे सरांची विशेष उपस्थिती होती. या महत्त्वपूर्ण प्रसंगी शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब आणि मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष मा. सुभाष माने यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
राज्यातील मुख्याध्यापकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवलेल्या या अधिवेशनात शिक्षण क्षेत्रातील अनेक ज्वलंत समस्यांवर चर्चा झाली. अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी महामंडळाचे सर्व पदाधिकारी, कोल्हापूर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार, सचिव आर. वाय. पाटील सर आणि इतर मान्यवर मुख्याध्यापक (शिखरे, पाटील, सनदे) उपस्थित होते. डॉ. डी. एस. घुगरे यांच्या सन्मानामुळे अधिवेशनाच्या उत्साहात अधिक भर पडली.





