श्री चंद्रशेखर क्षीरसागर यांची केंद्रीय पत्रकार संघाच्या राज्य मुख्यप्रवक्ते पदी पुनर्निवड
पत्रकार- सुभाष भोसले
येथील जेष्ठ पत्रकार आणि राज्यशास्त्र अभ्यासक श्री चंद्रशेखर क्षीरसागर यांची केंद्रीय पत्रकार संघाच्या राज्याच्या मुख्य प्रवक्ता पदी निवड झाली आहे. त्यांना नियुक्तीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष श्री संदीप कसालकर यांनी दिले आहे. विविध प्रसारम ाध्यमाच्या माध्यमातून शेतकरी, शिक्षक, सर्वासामान्यांच्या न्याय हक्कासाठी आपल्या लेखणीतून आवाज उठवून न्याय देण्यासाठी एक पत्रकार म्हणून त्यांची भूमिका महत्वाची असते. पत्रकारांना टोल माफी मिळणे, सरसकट सर्वच पत्रकारांना एस टी मोफत करणे, त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी मोफत राहण्याची सोय करणे यांसह विविध मागण्या केंद्रीय पत्रकार संघाच्या माध्यमातून मागण्यात आल्या होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे,माजी पालक मंत्री सुरेश खाडे,मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे वरील मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यात त्यांचा सक्रीय असा सहभाग होता. श्री चंद्रशेखर क्षीरसागर यांना शिर्डी येथे केंद्रीय मंत्री श्री रामदास आठवले आणि राष्ट्रीय अध्यक्ष श्री संदीप कसालकर यांच्या हस्ते आदर्श पत्रकार पुरस्कार देण्यात आला होता. तसेच नाशिक येथेही राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार 2025 देण्यात आला होता.अशा लढवय्या पत्रकाराची केंद्रीय पत्रकार संघाच्या राज्य प्रवक्ता पदी निवड झाल्याने सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.





