21.1 C
New York
Thursday, March 26, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

पुणे विभाग शिक्षक मतदार संघातून उमेदवारीसाठी श्री राजेंद्र नागरगोजे यांना वाढती मागणी

पुणे विभाग शिक्षक मतदार संघातून उमेदवारीसाठी श्री राजेंद्र नागरगोजे यांना वाढती मागणी

मिरज:- संजय पवार पुणे विभाग शिक्षक मतदार संघ उमेदवारीसाठी झालेल्या आटपाडी तालुकास्तरीय चर्चासत्रामध्ये सर्व तालुकास्तरीय संघटनांनी नागरगोजे सर यांना पाठिंबा जाहीर केला व आपली उमेदवारी करणे का गरजेचे आहे व प्रत्येक वेळी सांगली जिल्ह्यावर कशा पद्धतीने अन्याय झाला हे अनेक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समजावून सांगितले सांगली जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा असून शिक्षकांमधून क्रांती होणे गरजेचे आहे म्हणून शिक्षक हाच शिक्षकांचा आमदार झाला पाहिजे यावर सर्वांनी भर दिला कारण शिक्षकांचे प्रश्न हे शिक्षकांनाच माहीत असतात आणि विधानभवनामध्ये शिक्षकांचे आवाज उठवण्यासाठी आपला प्रतिनिधी असला पाहिजे असे विचार सर्वांना मते मांडण्यात आले आढावा बैठकीमध्ये मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री अजित चव्हाण सर यांनी नागरगोजे सरांशी उमेदवारी का गरजेची आहे हे सर्वांना समजावून सांगितले प्रस्थापित उमेदवारांना शिक्षकांच्या प्रश्नांचे गांभीर्य नसते अशी अनेक उदाहरणे देऊन त्यांनी समजावून सांगितले जीवनदीप विद्यालय कामत चे सहशिक्षक, व शिक्षक भरतीचे श्री एम एस पाटील सर यांनी शिक्षक असणारा उमेदवार का गरजेचा आहे त्यांनी त्यांच्या शेड्युलच्या वेळी आलेल्या अडचणी सांगितल्या राजारामबापू हायस्कूल आटपाडीचे मुख्याध्यापक श्री. माणिक साळुंखे सर यांनी प्रस्थापित आमदारांनी सहा वर्षांमध्ये फोन उचलले नाहीत अशी तक्रार त्यांनी यावेळी मांडली. प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक श्री शरद चव्हाण पाटील सर यांनी आटपाडी सांगोला पंढरपूर माळशिरस या तालुक्यामधून मताधिक्य देण्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष मुजावर सर यांनी विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी दिले. घाणंद हायस्कूल घाणंद चे माजी मुख्याध्यापक श्री डी नांगरे सर यांनी शिक्षण परिषदेतील चळवळीतील कार्यकर्ते 24 तास शिक्षकांसाठी उपलब्ध असतात त्यामुळे आपण नागरगोजे सरांच्या पाठीशी उभा राहून चळवळ जिवंत ठेवली पाहिजे हा विश्वास त्यांनी यावेळी दिला. ग दि माडगूळकर हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज माडगूळचे प्रा.के डी चांदणे सर यांनी सर्वसामान्य शिक्षकांच्या प्रश्नासाठी नागरगोजे सर यांनी केलेले कार्य विशद केले. कवठेमंकाळ शिक्षण परिषदेचे तालुकाध्यक्ष श्री पाटील सर यांनी शिक्षकावरती होणारे अन्याय नवीन होऊ घातलेला कायदा आणि यावर जर मार्ग काढायचा असेल तर नागरगोजे सरआमदार होणे का गरजेचे आहे हे त्यांनी सांगितले. शिक्षण परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री शिंदे सर यांनी चळवळीचे महत्त्व पटवून दिले व येणारा कायदा आणि स्वयं अर्थ साह्य शाळा यांच्यापासून होणारा धोका सांगितला. त्यानंतर श्री राजेंद्र नागरगोजे सर यांनी आपल्या मनोगतमध्ये गेल्या वेळेस झालेल्या बोगस मतदारा नोंदणी वरती प्रश्नचिन्ह निर्माण केले व सांगली जिल्हा हा एक संघ असल्याचे सांगून येणाऱ्या 9 नोव्हेंबर रोजी सांगली येथे होणाऱ्या शिक्षण परिषदेच्या आढावा बैठकीस सर्वांनी उपस्थित राहून जिल्ह्यातून एकच उमेदवार देऊया व तोच उमेदवार निवडून आणून विधानभवनात पाठवूया असे आवाहन केले यावेळेस आटपाडी तालुक्यामधील राजारामबापू हायस्कूल आटपाडीचे मुख्याध्यापक व शिक्षक भरतीचे तालुका अध्यक्ष श्री सुरेश कदम सर व सर्व स्टाफ घरनिकी हायस्कूल घरनिकी चे मुख्याध्यापक व सर्व प्राथमिक आश्रम शाळा आटपाडीचे मुख्याध्यापक व सर्व मानगंगा हायस्कूल हिवताडचे मुख्याध्यापक व सर्व स्टाफ जीवनदीप विद्यालय कामत चे मुख्याध्यापक व सर्व असतात पंडित दीनदयाळ प्रशालेच्या मुख्याध्यापिका व सर्व स्टाफ ग दि माडगूळकर हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज माडगूळ यांच्या मुख्याध्यापिका आणि सर्व स्थान पिंपरी हायस्कूल पिंपरी खुर्द चे मुख्याध्यापक आणि सर्व स्टाफ घाणंद हायस्कूल घाणंद चे मुख्याध्यापक आणि सर्व स्टाफ मातोश्री अंबुताई मोहनराव भोसले विद्यालय नेलकरंजीचे मुख्याध्यापक आणि त्यांचा सर्व स्टाफ, कार्याध्यक्ष श्री भास्कर कुंभार सर ,कार्यवाह श्री बाळासाहेब चोपडे सर यावेळी उपस्थित होते त्यावेळेस महिला शिक्षकांची संख्या लक्षणीय होती सदर कार्यक्रमाचे आभार शिक्षक परिषदेचे श्री एस एम पाटील सर यांनी मांडले अशा रीतीने उमेदवार निवडीची बैठक आनंदी वातावरणात पार पडली व एकमुखाने आपला उमेदवार आमदार करण्याचा ठरला.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles