सर्किट हाऊस कसबा बावडा येथे अखिल भारतीय कलाकार एकता महासंघाची मिटिंग उत्साहात संपन्न

पत्रकार :- सचिन लोहार
सोमवार दि. १३ ऑक्टोंबर रोजी कोल्हापूर येथील सर्किट हाऊस कसबा बावडा येथे आखिल भारतीय कलाकार एकता महासंघाची मिटीग अगदी थाटामाटात पार पडली.यावेळी कलाकारांचा बुलंद आवाज म्हणुन ओळखणारे मा. श्री अब्दुल गवंडी यांची सांगली- सातारा- कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून सर्वानु मते निवड करण्यात आली. तसेच सांगली जिल्हा अध्यक्ष (महीला आघाडी) म्हणून सौ. रुकसाना सरफरोश मुजावर यांची निवड करण्यात आली व इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी या वेळी करण्यात आल्या.
सदर निवडीचे पत्र अखिल भारतीय कलाकार एकता महासंघ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. जयवंतराव वायदंडे साहेब यांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी विविध मान्यवरानी आपले मनोगत व्यक्त केले. निवड झाल्यानंतर मा. श्री. अब्दुल गवंडी यांनी सांगितले की, शासनाच्या कोणत्याही योजने पासुन महाराष्ट्रातला कलाकार वंचित राहणार नाही. कलाकाराना हक्काचे घर मिळावे, त्यांच्या मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह व्हावे व कलाकारासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावे या व इतर मागण्यासाठी आमची लढाई सुरुच राहणार आहे व कलाकार मानधनचा कोणताही प्रश्न असो अखिल भारतीय कलाकार एकता महासंघाशी संपर्क साधावा असे आवाहन शेवटी अब्दुल गवंडी यांनी केले.
या कामी संघटनेचे पदाधिकारी मा श्री राम कुंभार ,महेश कदम, उदयराज पोवार, सुनिल पाटील, सचिन लोहार,अरूणा जाधव, जिल्हाध्यक्ष दिनकर भोसले,सातापा पाटील, शोभा पाटील , रुकसाना मुजावर मैडम लक्ष्मण जगताप, आश्रापा कांबळे,शैला कुंभार मैडम, वहिदा मुजावर, शितल कांबळे, पुष्पाताई थेरगावकर, सहदेव कांबळे, सरला गुरव सह इतर पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी आभार दिनकर भोसले यांनी व्यक्त केले.





