राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी आदर्श गुरुकुल विद्यालयाच्या कु.श्रावणी दोरकर हिची निवड
कोल्हापूर (प्रतिनिधी) – दिनांक 9 सप्टेंबर रोजी सातारा येथे झालेल्या विभागीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये आदर्श गुरुकुल विद्यालय व जुनिअर कॉलेज, पेठ वडगाव येथील कु. श्रावणी विजय दोरकर हिने उल्लेखनीय कामगिरी केली. 19 वर्षांखालील मुलींच्या गटात फिटा प्रकारात चौथा क्रमांक पटकावत तिने राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
या यशामध्ये संस्थापक अध्यक्ष डॉ. डी.एस. घुगरे, सचिव व मुख्याध्यापिका सौ. एम.डी. घुगरे, पर्यवेक्षक एस.जी. जाधव, प्रशासक एस.ए. पाटील, जिमखाना प्रमुख एन.ए. कुपेकर, एस.एस. मदने आणि प्रशिक्षक आर.के. डोंबे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.





