फोटो : विद्या कुडाळकर
नवे पारगाव : नवे पारगांव (ता.हातकणंगले) येथील साळोखे कॉलनीतील राहणाऱ्या विवाहितेने बुधवारी राहते घरी गळफास लावुन आत्महत्या केली. विद्या अतुल कुडाळकर (वय २८) असे यातील मयत विवाहितेचे नांव आहे. सदर घटनेची नोंद रात्री उशिरा वडगांव पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबबत वडगाव पोलीसांतून मिळालेली माहिती अशी : विवाहीता विद्या कुडाळकर या आपले पती अतुल कुडाळकर व आपले दिर अवधुत,सासु,सासरे असे मिळून एकत्र कुटूंबियात राहात होत्या. विद्या व अतुल यांना लग्न झालेपासून ७-८ वर्षापूर्वीपासून मुलबाळ होत नसल्याने त्या नैराश्यात होत्या. बुधवारी सकाळी पती अतुल व दिर कामानिमीत्त बाहेरगावी गेलेले असताना व दुपारी सासु सासरे घरी सर्वजण असताना सामसुम झालेनंतर नेहमीप्रमाणे विद्या या वरच्या मजल्यावरील विश्रांती साठी गेल्या होत्या.पण बराच वेळ होवुन त्या खाली न आल्याने वर जात घरच्यानी दरवाजातून आवाज देवुनही त्यांचा आतुन प्रतिसाद न मिळालेने दरवाजा मोडून काढला पण तोपर्यंत समोर विद्या यांनी पत्र्याचे अँगलचे साखळीला नायलॉनचे दोरीने गळफास लावुन घेतलेचे निदर्शनास आले.
तिला तात्काळ उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्नालयात दाखल केले पण तत्पुर्विच त्या मयत झालेचे संबंधित डॉक्टरानी सांगितले.डॉ. गुंजन पाटील यांनी शवविच्छेदन करून रात्री उशिरा मृतदेह नातलगांच्या ताब्यात दिला.याबाबत अधिक तपास वडगांवच्या पोलीस उपनिरीक्षक अनिता पवार,पो.हे.कॉ. प्रसाद खैरमोडे,स्वाती कांबळे करत आहेत.





