-10.2 C
New York
Sunday, January 25, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

निसर्ग रक्षणासाठी वन्यजीवांचे संरक्षण अपरिहार्य – कमलेश पाटील

तळसंदे: विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कमलेश पाटील, समवेत मान्यवर.

 

डी. वाय. पाटील बी. टेक. अ‍ॅग्री मध्ये वन्यजीव सप्ताह संपन्न 

 

तळसंदे –

निसर्गाचे सौंदर्य टिकवायचे असेल, तर वन्यजीवांचे संरक्षण अपरिहार्य आहे. प्रत्येक तरुणाने पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वतःची आहे असे समजून कृती करावी, असे आवाहन सहाय्यक वनसंरक्षक कमलेश पाटील यानी केले. डी. वाय. पाटील बी. टेक. अ‍ॅग्री महाविद्यालयात वन्यजीव सप्ताहच्या सांगता समारंभात ते बोलत होते.

महाविद्यालयात १ ते ७ ऑक्टोबर कलावधीत वन्यजीव सप्ताह संपन्न झाला. सहाय्यक वनसंरक्षक कमलेश पाटील (कोल्हापूर) आणि वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलावडे (करवीर) यांच्या प्रमुख उपस्थिती यावेळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कॅम्पस डायरेक्टर आणि प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, उपप्राचार्य इंजी. पी. डी. उके आणि प्रा. संदीप पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

कमलेश पाटील यानी विद्यार्थ्यांना ‘वन्यजीव संरक्षणासाठी संसाधन व्यक्ती म्हणून कार्य करण्याचे आवाहन केले. त्यांनी अन्नसाखळी संतुलित ठेवण्याचे महत्त्व सांगून वन्यजीवांचे नोंदवही ठेवण्यास प्रोत्साहित केले. ‘रेड डेटा बुक’ विषयी माहिती देऊन जिम कॉर्बेट यांची पर्यावरण विषयक पुस्तके वाचण्याचा आग्रह धरला.

वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलावडे यांनी आपले व्यावहारिक अनुभव सांगितले. वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आणणारे घटक व संकटे थांबवण्यासाठी समाजाचा सक्रीय सहभाग आवश्यक असल्याचे त्यानी सांगितले. वन्यजीव संरक्षणाच्या कार्यात वनविभागास सहकार्य करण्याचे आवाहन त्यानी केले.

डी. वाय. पाटील एज्युकेशनल सिटीचे सुरक्षा प्रमुख व वन्यजीव व पर्यावरण अभ्यासक देवेंद्र भोसले यांनी सादरीकरणाद्वारे कोल्हापूर व महाराष्ट्राच्या वन इतिहासाची माहिती दिली. त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या वन्यजीव संवर्धनावरील दृष्टीकोन, ‘शिवआरण्य’ येथे भारतात हत्ती संवर्धनाची सुरुवात, तसेच भारतातील प्रमुख वन्यजीव अभयारण्यांची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. वन्यप्राणी दिसल्यास त्याच्या मागे जाऊ नये, फोटो किंवा व्हिडिओ घेऊ नयेत, अफवा पसरवू नयेत असे आवाहन त्यानी केले.

सुत्रसंचालन कु. नम्रता शिंदे यांनी केले, तर श्री. संदीप पाटील नियोजन व समन्वय केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles