-10.8 C
New York
Sunday, January 25, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडेच्या १४ खेळाडूंची राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेसाठी निवड

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडेच्या १४ खेळाडूंची राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेसाठी निवड

 

वाटद-खंडाळा येथे पार पडलेल्या जिल्हा असोसिएशन सब-ज्युनियर डॉजबॉल निवड चाचणीतून सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कूल या शाळेतील एकूण १४ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामध्ये ८ मुले आणि ६ मुलींचा समावेश असून, शाळेने दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरावर पोहोचण्याची यशस्वी परंपरा कायम राखली आहे.

राज्यस्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींपैकी नंदिनी रवींद्र जाधव, धनश्री नारायण बळकटे, अक्षरा विनोद झर्वे, अन्वया निलेश पावरी, सई देवचंद्र पावरी आणि श्रुतिका सुरेश निवेंडकर यांचा समावेश आहे. तर मुलांमध्ये रुद्र महेंद्र जाधव, श्रवण मनोज जाधव, पूजन रमेश धातकर, वेदांत सहदेव धातकर, आरव अविनाश जाधव, ऋग्वेद मोरेश्वर झर्वे, शुभम विनोद जाधव आणि प्रेम मोहन पवार यांची निवड करण्यात आली आहे.

या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धा २६, २७ व २८ ऑक्टोबर २०२५ रोजी पुणे येथील पिंपरी-चिंचवड येथे होणार असून, यामधून निवडक खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळणार आहे.

या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांनी क्रीडा शिक्षिका सौ. ऋतुजा जाधव मॅडम यांचे तसेच सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. तसेच मुस्लिम एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष रहीम साहेब, सर्व पदाधिकारी व सदस्यांनीही सर्व यशस्वी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

 

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles