एबीपी शिक्षण समूहाचे खो खो मध्ये वर्चस्व काय
नवे पारगाव. क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर व छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन पेठ वडगाव आयोजित शालेय शासकीय हातकणंगले तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये हे एबीपी शिक्षण समूहाच्या वारणा विद्यानिकेतन व आबासाहेब पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स नवे पारगाव ने खो खो मुलांच्या गटात 19 वर्षाखालील मुले व 17 वर्षाखालील मुले प्रथम क्रमांक मिळविला तर 14 वर्षाखालील मुले तृतीय क्रमांक प्राप्त केला.
एकाच वेळी दोन संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र या उल्लेखनीय बाबीची एबीपी ने हॅट्रिक केली.
17 वर्ष मुलांच्या गटात अंतिम सामन्यात ग्रीन वॅली पेठवडगाव वरती व 19 वर्ष मुलांच्या गटात बळवंतराव यादव पेठ वडगाव यांच्यावर विजय मिळविले.
14 वर्ष मुलांच्या गटात सेमी फायनल ला गुरुदेव नॉलेज सिटी स्कूल तारदाळ विरुद्ध 1 गुणाने पराभव मिळाल्यामुळे तृतीय क्रमांक मिळाला.
19 वर्षाखालील मुलांच्या संघात संयम मगदूम, अक्षय केदार, रोहित कार्वेकर, हर्षवर्धन गायकवाड, सोमनाथ नलवडे, अनिरुद्ध कुंभार, तर 17 वर्षे मुलांच्या संघात अनिकेत काळे, पारस मोरे, आर्यन सूर्यवंशी, कुणाल सावंत, कृष्णा वाघमारे, यांनी प्रेक्षणीय कामगिरी केली.
सर्व यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षिका संगीता सकटे व क्रीडा प्रमुख गोरक्ष सकटे यांचे यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ए बी पाटील , संस्थेचे सचिव अमोल कुमार पाटील , सचिवा राजलक्ष्मी पाटील , संचालिका आकांक्षा पाटील , प्रशालेचे प्राचार्य एस आर पाटील ,जूनियर विभाग प्रमुख माळी ,वस्तीगृह अधीक्षक मोहन पाटील मेजर ,क्रीडा प्रमुख गोरक्ष सकटे , वरिष्ठ क्रीडा प्रशिक्षक सतिश पाटील ,वस्तीग्रह प्रमुख अक्षय देशमुख यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.





